मौजे पूर कुकडेश्वर येथील जि.प.प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना हर्ष ॲन्ड हेली फाऊंडेशन ठाणे व प्रेम सेवा महीला मंडळ यांचे वतीने मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले,अशी माहीती शिक्षक सचिन मुळे यांनी दिली.या साहित्यामध्ये ऊबदार स्वेटर,पाटी ,वह्या ,पेन्सिल,रबर, चित्रकला वही,रंगपेटी इ.साहित्य वाटप करण्यात आले. हर्ष ॲन्ड हेली फाऊंडेशन गेली अनेक वर्ष सामाजिक जाणिवेतून विविध उपक्रम राबवित असून शाळेस संगणक शिक्षणासाठी लॅपटॉप देणार असल्याचे आनंद तुरखिया यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी हर्ष ॲन्ड हेली फाऊंडेशन चे आनंद तुरखिया, लिनेट तुरखिया, स्टेला मोरियस ,हर्ष शाह,सोना शाह,रमेश शाह,भाविक सोनी ,सरपंच उषाताई चिमटे,उपसरपंच ताराचंद दिवटे ,दुंदा दिवटे,प्रदिप दिवटे,एकनाथ दिवटे ,दामोदर चिमटे,सचिन दिवटे,सुनिल दिवटे. सुनिता दिवटे,ज्योती भालचीम,जिजाबाई गवारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिरामण पोटे व सुरेखा पोटे यांनी साहित्य मिळविण्यासाठी पाठपुरावा केला.यावेळी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.खाऊवाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक पतसंस्थेचे संचालक सचिन मुळे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक चंद्रकांत पारधी व विद्यार्थीनी समृद्धी पोटे यांनी केले.

Post a Comment
0 Comments