प्रतिनिधी घोडेगाव | सुरंजन काळे
घोडेगाव - आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, घोडेगाव येथील इ.५ वीच्या कु. मृण्मयी अभिमन्यू भुजबळ या विद्यार्थिनीने शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत ७ वे तर जिल्ह्यात आठवे स्थान मिळवले असून इ .८ वी च्या कु. स्वर्णिमा वैभव डोंगरे या विद्यार्थिनीने राज्य गुणवत्ता यादीत १७ वे तर जिल्ह्यात २७वे स्थान प्राप्त केले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत इंग्लिश मीडियम स्कूलच्या एकूण १३ विद्यार्थ्यांनी राज्य तथा जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता आठवी मध्ये एकूण ९ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये झळकले आहेत.
त्यामध्ये ऋग्वेद संजय बोऱ्हाडे(J-98), कुमारी अनुष्का वसंत लांगी (J-113), कु. शुभम भरत घोरपडे (J-155), कु. अस्मि हर्षद राऊत(J-182), कु. प्रेम अमरदीप वंजारी(J-261), कु. ईशान संदीप पिंगळे(J-375), कु. रुद्र नीलकंठ काळे(J-440), कु. यशवंत हिंदुराव गेजगे(J-480), कु. श्रावणी संतोष हुले (A1/5) कु. शार्दुल भालचंद्र बोऱ्हाडे (242/296)या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करून जिल्हा यादीत स्थान पटकावले. तसेच पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण दोन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. त्यामध्ये कु. कुमारी दूर्वा बिपिन रासकर(J-204), कु. ओवी तानाजी गाडे(J-512) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या स्कूलच्या आदर्श प्राचार्या श्रीमती मेरी फ्लोरा डिसूजा, उपप्राचार्या रेखा आवारी, शिक्षिका, सौ सोनीका नायकोडी, सौ प्रज्ञा घोडेकर, श्रीमती सुप्रिया मंडलिक, सौ सुषमा फलके, सौ. मनीषा भास्कर, श्री. संतान आसंगी , सौ स्मिता पवळे, श्री चेतन पोखरकर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. तुकाराम नामदेवराव काळे, उपाध्यक्ष मा. एडवोकेट संजय दत्तात्रय आर्वीकर,कार्याध्यक्ष श्री. सुरेश शेठ गजानन शेठ काळे, संस्थेचे मानद सचिव श्री विश्वासराव अरविंद काळे, सहसचिव श्री प्रशांत बाळासाहेब काळे, वसतिगृह कमिटीचे चेअरमन माननीय श्री. सूर्यकांत फुलचंद गांधी,संस्थेचे खजिनदार माननीय श्री सोमनाथ भाऊ वसंतराव काळे, विद्यालयाचे चेअरमन माननीय श्री बाळासाहेब काशिनाथ काळे, संस्थेच्या समन्वय समितीचे चेअरमन श्री राजेश कैलास शेठ काळे,संस्थेचे संचालक श्री अजित दत्तात्रय काळे श्री अक्षय रामशेठ काळे श्री वैभव बबनराव काळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करून अभिनंदन केले. परिश्रम, जिद्द, चिकाटी, मेहनत तसेच सातत्याने सराव या सर्व बाबी स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तुंग संपादन करण्यासाठी आवश्यक आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण जे ध्येय ठेवले आहे ते गाठण्यासाठी त्याचा सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे. तेव्हाच असे उत्तुंग यश आपणास प्राप्त होते असे उद्गार संस्थेचे अध्यक्ष श्री तुकाराम काळे यांनी काढले. भविष्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन यश संपादन करावे असा संदेश त्यांनी यावेळी सर्व विद्यार्थ्यांना दिला.
Post a Comment
0 Comments