Type Here to Get Search Results !

कवी प्रा पल्लवी रासकर लिखित काव्य "बाबा हवे होते"



बाबा हवे होते ..


🚩 बाबा आणि नातीचं                

      नातं काही वेगळंच होतं,

       त्या नात्यात काही वेगळचं 

         प्रेम होतं,

         बाबा आठवतात मला, 

           त्यांचं असणं नी दिसणं 

             रुबाबदार होतं,

म्हणूनच तर त्यांना गावात पाटील म्हणून ओळखलं जात होतं.

बाबांमुळे आमच्यात रुजले, वारकरी सांप्रदायाचे महत्त्व, 

पंढरपूरच्या विठ्ठलाशी जोडून दिल आमचं भक्तीमय नातं, 

तेव्हापासून येऊ लागले आमच्या घरी पंढरीचे वारकरी,

मुखात होते सदा त्यांच्या राम कृष्ण हरी🚩

तेव्हापासून आजपर्यंत नाद गुंजला घरात राम कृष्ण हरी🚩

नाही चुकवली बाबांनी आमच्या कधी पंढरीची वारी🚩

सदा मुखात होते त्यांच्या राम कृष्ण हरी नी बाबांनी केली पायी सतरा वर्षे पंढरीची वारी बाबा तुम्ही गेलात तरी अजूनही येतात घरी वारकरी सदा म्हणत राम कृष्ण हरी पण चुकविली नाही बाबा आई दादांनी अजूनही पंढरीची वारी नी सदा त्यांच्याही मुखात राम कृष्ण हरी🚩


कवयित्री. सौ पल्लवी निलेश रासकर

श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर

Post a Comment

0 Comments