अपेक्षाचं ओझं
मुलांकडून शिक्षणाबाबत
जास्त ठेवू नये अपेक्षा आज
त्यांच्या आवडी प्रमाने होऊ द्या
अन्यथा होईल अभ्यासाच ओझं...१
डिजिटलचे स्पर्धात्मक जग
म्हणून इथे महत्व शिक्षणाला
तेपण योग्यच म्हणावे लागेल
त्यापेक्षा महत्व मानसिकतेला...२
प्रत्येकाची आवड वेगवेगळी
अडथळा आणू नये आवडीत
त्यांना योग्य मार्गाने जाऊ द्या
अन्यथा जातील ती पिछाडीत...३
मुक्तपणे मुलांना राहू द्या नित्य
मित्रांसम रहावे त्याच्याबरोबर
असे योग्य संस्कार केल्यास
गाठतील ती यशाचे शिखर...४
सुरेश शिर्के
खारघर,पनवेल

Post a Comment
0 Comments