Type Here to Get Search Results !

कुरण ग्रामपंचायतीच्या वतीने ६५ महीलांना शिवणकला प्रमाणपत्र वाटप.



जुन्नर | कुरण ग्रामपंचायत व श्री राधेश्याम रोजगार व स्वयंरोजगार संस्था जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण व महीलांना स्वयंरोजगार सुरु करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने महीलांसाठी शिवणकला प्रशिक्षणाची निवड करण्यात आली. 



यामध्ये एकूण ६५ महीलांना श्री राधेश्याम रोजगार व स्वरोजगार संस्था यांच्या मार्गदर्शनात ४० दिवसाचे शिवणकला प्रशिक्षण देण्यात आले होते. त्याचे प्रमाणपत्र वाटप श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री सत्यशिल शेरकर यांच्या पत्नी योगिता शेरकर यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या हस्ते प्रमाण पत्र वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात महीलांनी शेती व्यवसाय करीत घरातील कामे करून प्रशिक्षणाला वेळ देवून स्वतः च्या पायावर उभे राहून शिवणकला प्रशिक्षण पूर्ण केले. 



नवनवीन प्रकारचे लहान मुलांच्याकपड्यांपासून ते ब्लाऊज , पंजाबी ड्रेस अनेक प्रकारचे कपडे कसे शिवायचे हे शिकून घेतले. या बद्दल उपस्थित सर्व महिलांचे कौतुक केले तसेच महीलांना रोजगाराची संधी व महीलांच्या हाताला कौशल्य मिळाले या बद्दल कुरण ग्रामपंचायत सरपंच व श्री राधेश्याम संस्था व शिवणकला प्रशिक्षक व उपसरपंच वैशाली थोरवे यांचे अभिनंदन व कौतुक केले. यावेळी उपस्थित महीलांनी आपले मनोगतामध्ये आम्हाला कौशल्य मिळाले आम्हाला घरसंसारात हातभार लागत आहे म्हणून सर्व महिलांनी आनंद व्यक्त केला. या वेळी कार्यक्रम अध्यक्षा 

योगिताताई शेरकर, सरपंच दिलीप गव्हाणे, उपसरपंच सचिन नवले, श्रीराधेश्याम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण, प्रशिक्षक व शिरोली बु. उपसरपंच वैशाली थोरवे, दिपाली बांगर व सदस्य. दत्तात्रय नवले, मीरा नवले, वैशाली पोपाळकर, शिल्पा आमले, ग्रामसेवक उर्मिला चासकर, विठ्ठल नवले (मा. संचालक शिरोली बु) यात्रा कमिटी अध्यक्ष किरण नवले, अरुण नवले, विवेक नवले (मा.तंटामुक्ती अध्यक्ष), दत्तात्रय महादू नवले (ज्येष्ठ नागरिक) सीआरपी सौ.अस्मिता नवले महिला उपस्थित होते श्री राधेश्याम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण यांनी संस्थेच्या वतीने गरजू महीलांना प्रशिक्षण संपूर्ण राज्यात देत असून गरजू लोकांनी संस्थेशी संपर्क करून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.



Post a Comment

0 Comments