Type Here to Get Search Results !

प्रा. छाया बोरकर लिखित विचारमंथन क्र.३१३

 


बेईमान हरामखोर जगात आपलं म्हणून, जीव प्राण ओतून, रक्ताचं पाणी करतं जीवाचं रान करत, पैसा अडका नसतानाही कोणाचं कितीही केलें तरी या हरामखोर बेईमान जगात करणाऱ्याला काही किंमत आणि नावं राहत नाही. मग तुम्ही हातचं द्या, बोटचं द्या,कितीही द्या.. तरी बोलत सुद्धा नाही आणि  फुग्या सारखे फुगून नाही तसे वागतात. तेव्हां मात्र माणसाला दुःख वेदना होतात की, आपणं एवढं केल्यानंतरही हया व्यक्ती आपल्याला दोषारोपण करतं, हे नाही केले..ते नाही केलें,म्हणत नाही तशा चूका शोधतात आणि नाही तसे बोलत. दूर व्यवहार करत कधीचं खरे बोलत नाही व वागत सुद्धा नाही. ते म्हणतात ना,कुत्र्याची शेपटी कितीही नरीत टाकली तरी ती वाकडी ती वाकडीचं... त्या प्रकारे हे वागतात.इतकेच नाही तर, आपल्या पाठीमागे आपल्याला नाही तसे नांव ठेवत पोसले कुत्रे चावायला धावतात त्या प्रकारे ते दूर व्यवहार करतात तेव्हा,मात्र आपल्या काळजावर अनेक  घाव घातल्या सारखे वाटते की, आपल्या केल्या घेतल्याचा आपल्याच व्यक्तीना काही नावं नाही.आपण आज इथ पर्यंत कोणामुळे आलो आहोत,हे ते दिवस पलटल्या नंतर विसरतात. तेव्हा मात्र माणसाच्या काळजाच्या चितळ्या चितळ्या होतातं आगीत धग धग पेटतो आणि स्वतःच्या मनाला वाटते  की, आपण ज्याच्यासाठी  रात्रीचा दिवस करत धडपड करतो.ते मात्र वेळ निघून गेल्यावर हारोमखोर बेईमान होऊन विसरले आणि बेईमान झाले.जो करत नाही तो मात्र बिनधास्त हासी खुशीत जगत मज्या मारतो.तर करणाऱ्या मागे अनेक कटकटी विघ्नानी घेरला असतो.त्यामुळे मग माणसाला वाटते की, आपण बिनधास्त जगायचे कोणाचे वाईट करायचं नाही,  कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कोणासाठी वाईट वाटून घ्यायचे नाही. कारण जगात लोकांची विविध रूप असतात. मागे बोलतील काय..?? पुढे बोलतील काय..?? मग करूनही माणसाची करणी निरर्थक ठरते. तरी पण माणसाने स्वतःशीचं  प्रामाणिक शिस्तीत  बिनधास्त जगायचं.. कुणाच्या जिंदगीत दखल द्यायची नाही. डोकवायचं नाही, कुणाविषयी वाईट बोलायचं नाही व स्वतःबरोबर दुसऱ्यांचे हीत जपत जेवढं जमेल तेवढ करतचं माणुसकीचा धर्म पाडायचं.मग कोणी नावं घेतलं नाही तर चालेलं घेतलं तरी चालेल. निस्वार्थ पणाने जगत थंड पाणी आणि गरम स्त्री जशी कपड्याच्या सुरकुत्या घालवते. तसेच शांत डोकं व उबदार मन हे ठेवत आयुष्यातील चिंता घालवत  पुन्हा जीवनाला नवचैतन्य निर्माण करत  बोलणाऱ्या कडे दुर्लक्ष करत जीवन हसत खेळत जगायचं याचं जगण्याला जीवन म्हणतात.कोणी आपल्याला कितीही म्हटलं,केलें नाही तरी चालले मात्र कोणाच्या मनल्या बोलण्याने माणसाने मनाने स्वतः दुःखी कष्टी होऊ नये.. आणि निस्वार्थ भावना मनी बाळगावी वाहत्या पाण्याप्रमाणे वाहत जगायचं याचंच नाव जीवन आहे.!!!

🌺🌺🌺🌺🌺🌺

प्रा. छाया बोरकर 

अर्जुनी/ मोरगाव. जिल्हा/ गोंदिया


Post a Comment

0 Comments