धबधबा...("काव्यांजली")
धोधो पावसात
पाणीच पाणी साठले
तळेपण भरले
तुडूंब! ----१
पाण्याची खळखळ
जिकडे तिकडे सुरू
हिरवेगार तरू
रानात! ----२
वा-यासंगे पाऊस
कधी रिमझिम धारा
निसर्ग सारा
बहरला! ----३
मोकळे झाले
काळे काळे ढग
विहरती खग
गगनात! ----४
द-याखो-यातून निघाला
बागडत आणि खळखळत
जमिनीवर झेपावत
धबधबा! ----५
सुरेश शिर्के
खारघर,पनवेल
Post a Comment
0 Comments