प्रतिनिधी घोडेगाव | सुरंजन काळे
घोडेगाव: दि. ५/७/२०२५ घोडेगाव येथे न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्री-प्रायमरी विभागाने"आषाढी एकादशी"निमित्त बाल दिंडीचे आयोजन केले होते. प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून, कपाळावर गंध, गळ्यात तुळशीच्या माळा, खांद्यावर पताका घेऊन, टाळ वाजवत, डोक्यावर तुळस घेऊन ज्ञानोबा, माऊली, तुकाराम अशा घोषणा देत बाल दिंडीमध्ये सहभागी झाले. यावेळी प्री प्रायमरी विभागाच्या सौ सुप्रिया हुले यांनी विद्यार्थ्यांना आषाढी वारी तसेच आषाढी एकादशीनिमित्त माहिती सांगितली. गोष्टी रुपातून एकादशी चे महत्व समजावून सांगितले. छोट्या वारकऱ्यांची घोडेगाव मध्ये वाजत गाजत ग्यानबा तुकाराम च्या जयघोषात छान दिंडी काढण्यात आली . सर्व चिमुकल्यांनी विठ्ठलाच्या नाम गजरात टाळ वाजवून दिंडीचा आनंद लुटला.
आषाढी एकादशी कशी साजरी केली जाते, दिंडी कशी काढली जाते हे मुलांना या उपक्रमातून पटवून दिले. आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष श्री तुकाराम काळे, उपाध्यक्ष एडवोकेट श्री संजय आर्वीकर, कार्याध्यक्ष श्री सुरेश शेठ काळे, सचिव श्री विश्वास काळे,संस्थेचे सहसचिव श्री प्रशांत काळे, संस्थेचे खजिनदार श्री सोमनाथ काळे, समन्वय समिती चेअरमन श्री राजेश शेट काळे,श्री. सूर्यकांत गांधी, संचालक श्री अजित काळे व श्री अक्षय काळे श्री वैभव काळे,विद्यालयाचे चेअरमन श्री बाळासाहेब काळे, यांनी या चिमुकल्या वारकऱ्यांचे व वारी निमित्त घेण्यात आलेल्या विद्यालयातील या विशेष उपक्रमाचे कौतुक केले. बाल वयामध्येच आपली संस्कृती व अध्यात्माचे अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन करण्याचे काम आपल्या विद्यालयातील शिक्षक करत आहेत आणि खरे तर ही काळाची गरज आहे. असेच नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यालयात राबवावेत, त्यांच्यावर उत्तम संस्कार करून त्यांना उत्तम नागरिक म्हणून घडवण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन संस्थेचे उपाध्यक्ष एडवोकेट श्री संजय आर्वीकर यांनी केले. या उपक्रमासाठी विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती मेरी फ्लोरा डिसोजा,उपप्राचार्या श्रीमती रेखाआवारी, संगीत शिक्षक श्री.गंगाराम तनपुरे, श्री. समीर मुजावर सर, विद्यालयाचे शिक्षकेतर सेवक वर्ग, इयत्ता नववीच्या गाईड पथकातील सर्व विद्यार्थीनी यांचे बहुमोल सहकार्य लाभले. सौ मनिषा बांबळे यांनी सूत्रसंचालन केले व सौ. मनिषा घुले यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
Post a Comment
0 Comments