प्रतिनिधी | सुरंजन काळे
आळेफाटा (ता.जुन्नर) : निरंकारी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने रविवार, ०६ जुलै २०२५ रोजी संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन द्वारा आयोजित संत निरंकारी सत्संग भवन, आळेफाटा पुणे) येथिल शिबिरात १०८ जणांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन पिंपळवंडी गावच्या लोकनियुक्त सरपंच तथा प्रथम नागरिक सौ मेघाताई काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संत निरंकारी मिशनचे अनेक पदाधिकारी यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते.
संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळोवेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम राबवण्यात येतात यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी, नेत्र चिकित्सा शिबिर तसेच महिला सशक्तिकरण, बाल विकास, नैसर्गिक संकटाच्या वेळी सहाय्यता यांसारख्या कल्याणकारी योजनांच्या आयोजन केले जाते.
वरील रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशनचे अनेक अनुयायांचे योगदान लाभले. शेवटी सर्व रक्तदात्यांचे आभार आळेफाटा शाखेचे प्रमुख श्री चंद्रकांत कुऱ्हाडे यांनी मानले.
Post a Comment
0 Comments