संग लाभता तुझी...
संग लाभता तुझी
मिळे जीवना उभारी
गोते खाणारी नाव
जशी निघे किनारी...१
फडफड पंखांची ती
बळ मिळता भरारी
कोमजणा-या फुला
जल थेंबांनी तरारी...२
निराशेच्या गर्तेतील
आशाकिरण लहरी
हरवलेले आवडते
पुन्हा मिळता करी...३
पौर्णिमेचा चंद्र हा
चांदण्यांत भारी
तापणा-या भूमित
पडता पाऊस सरी...४
काहीशी अशीच
साथ जीवनसागरी
त्याच्याविना अपुर्ण
आनंद या संसारी...५
सुरेश शिर्के
खारघर,पनवेल
Post a Comment
0 Comments