"पंढरीचे वारकरी"
आसं ठेवूनी मनी दर्शनाची पायी चालतो वारकरी🚩🚩
कधी होईल भेट माझ्या विठूची सदा उभा जो विटेवरी🚩
कर कटेवरी ठेवुनी उभा विटेवरी राऊळी पंढरी🚩
चंद्रभागेच्या पात्रात वारकरी स्नान करी तीरावरी 🚩
मुखी घेऊनी नाम सदा राम कृष्ण हरी🚩
मग्न होऊनी अभंगात टाळ वाजे टाळकरी🚩
टाळ मृदुंगाच्या ठेक्यात फुगडी घाले वारकरी🚩
माऊलींचा घोडा रिंगणात फिरतो बरोबरी🚩
एका तालात भजन गातो वारकरी🚩
टाळ वीणा मृदुंगात अवघी दुमदुमली पंढरी🚩
जरी नाही मिळाले दर्शन लावून बारी🚩
विठु माझा दर्शन देतो येऊनी कळसावरी🚩
असं देव नी भक्ताचं नातं लोहपरिसापरी 🚩
देव नाही रे फक्त मंदिरी🚩
तो वसला आहे सर्व भक्तांच्या अंतरी🚩
म्हणूनी देवाच्या ठायी वेडा झाला माझा पंढरीचा वारकरी🚩🚩
कवयित्री-प्रा.पल्लवी बाळासाहेब शिंदे.
श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर.
Post a Comment
0 Comments