Type Here to Get Search Results !

गुरुकुल स्कुल सावरगावची ग्रंथ दिंडी व पर्यावरण दिंडी.



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर

गुरुकुल प्री स्कूल अँड ऍक्टिव्हिटी सेंटर, सावरगाव येथील छोट्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सावरगाव मध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळ्यामध्ये उस्फूर्त सहभाग घेतला आणि सावरगाव मधील प्रदक्षिणा मार्गाने ग्रंथ दिंडी व पर्यावरण दिंडी चे आयोजन केले. नर्सरी, ज्युनिअर केजी व सिनियर केजी मधील सर्व विद्यार्थ्यांनी या ग्रंथ दिंडीमध्ये सहभाग घेतला. यामध्ये पालखी समवेत वासुदेव, पथनाट्य सांस्कृतिक नृत्य आदी कार्यक्रमांचा सहभाग होता या पालखी सोहळ्यामध्ये व ग्रंथ दिंडी सोहळ्यामध्ये सावरगाव मधील ग्रामस्थांनी सहभाग घेतला आणि सहकार्य केले गुरुकुल स्कूलच्या सर्व पालकांनी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग घेऊन सहकार्य केले. 

गुरुकुल स्कूल च्या वतीने पालखी सोहळ्याच्या निमित्ताने विद्यार्थी आणि पालकांसाठी पालखी बनवा स्पर्धा घेतली गेली यामध्ये 40 पेक्षा जास्त पालकांनी सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांसमवेत आपल्या वेगवेगळ्या कल्पना वापरून व टाकाऊ पासून टिकाऊ (बेस्ट आऊट ऑफ वेस्ट) पालख्या बनवल्या. विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा मध्ये वारकरी डोक्यावर तुळशी वृंदावन, वाघ्या, मुरुळी, भारुड, वासुदेव, भालदार, चोपदार, विठ्ठल, रुक्मिणी इत्यादी पेहरावा मध्ये उत्कृष्ट सादरीकरण केले, अशा प्रकारच्या दिंडी सोहळ्याचे नियोजन गुरुकुल स्कूल च्या वतीने दरवर्षी केले जाते याशिवाय सर्व धार्मिक सण आणि समाज सुधारक, वैज्ञानिक यांच्या जयंती आणि पुण्यतिथी विद्यार्थ्यांसमवेत साजऱ्या केला जातात, अशी माहिती गुरुकुल स्कूलच्या प्राचार्या सौ जयश्री शेटे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments