प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर
जि.प.प्रा.शा पन्हाळवाडी ता भूम जि धाराशिव चे पोतरे सरांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त साहित्यरत्न जीवनगौरव पुरस्कार २०२५ चा पुरस्कार जाहिर झाला असून सन्मानपत्र,निवडपत्र,ट्रोफी,व सन्मानचिन्हासह त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमांतुन शाळेत इयता पहिली ते चौथी च्या सर्व विदयार्थी यांची अध्ययन निष्पती क्षमता प्राप्त करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.विद्यार्थी अध्ययनासाठी नवनवीन पद्धतींचा स्वीकार व प्रत्यक्ष कार्यवाही ते करतात.तालुकास्तरीय शालेय सांस्कृतिक कार्यक्रम अशा उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार त्यांना मिळाला आहे. संबंधित पुरस्काराचे वितरण हा दि. २३ ऑगष्ट रोजी हरी प्रिया मल्टीपर्पज हॉल, माधवनगर मिरज रोड, चाणक्य चौक सांगली येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल आदरणीय श्री भट्टी साहेब गटशिक्षणाधिकारी, सन्माननीय श्री कांबळे दादा केंद्रप्रमुख व विषय शिक्षक सन्माननीय श्री हुंबे सर यांच्यासह इतर मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. परिसरात सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
Post a Comment
0 Comments