निर्णय...
कठीण प्रसंगी
निर्णय ती घेते
परिपक्व बुध्दी
कृती ती करते.....१
वेळेचे ते भान
असे त्या मनाला
पार होतसे तो
भ्रष्ट प्रसंगाला.....२
योग्य निर्णयाने
बसे नीट घडी
भविष्यात कधी
नसे परवडी.....३
विचार पूर्वक
व शांतबुध्दीने
निर्णय पुर्णत्व
त्या समबुध्दीने.....४
म्हण 'अति घाई'
जाई संकटात,
प्रमाणे जीवन
ते होते उध्वस्त.....५
सुरेश शिर्के
खारघर,पनवेल
Post a Comment
0 Comments