Type Here to Get Search Results !

कवी सुरेश शिर्के लिखित काव्य रचना "बंध मैत्रीचे"


 

बंध मैत्रीचे


मैत्रीच्या बंधने

जग जोडलेले

प्रेमाच्या धाग्याने

घट्ट बांधलेले.....१


कुठलेही नाते

प्रथम मैत्रीचे

दिव्यात असणे

जसे हे वातीचे.....२


कृष्ण सुदाम्याच्या

मैत्रीची कहाणी

धडा संस्काराचा

आपल्या जीवनी.....३


मैत्रीने फुलते

बाग आनंदाची

एकमेकां असे

साथ आधाराची.....४


मैत्रीविना असे

जीवन अधुरे

जसे पाण्याविना

जलचर मरे.....५


सुरेश शिर्के

खारघर,पनवेल

Post a Comment

0 Comments