श्री पप्पू शेठ शिंदे युवा मंच यांच्या अध्यक्षतेखाली दहिहंडी उत्सव सोहळा पार पडला. हजारो गोविंदांनी या दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होत लाखोंची पारितोषिकं जिंकली. तसंच मानवी मनोऱ्यांचे उत्कृष्ट प्रदर्शन दाखवत गोपाळकाला साजरा केला.
या दहीहंडी उत्सव सोहळ्यामध्ये आनंदाचे रंग भरण्यासाठी विविध दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावत गोविंदांचा उत्साह द्विगुणीत केला. एपीएमसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिंदे साहेब,युवा नेते श्री निशांत भाई पाटील तुर्भे,भाजप वाहतूक सेनेच्या सरचिटणीस सौ.प्रितीताई नायर ,एपीएमसी मार्केट चे प्रसिद्ध व्यापारी श्री.महेशशेठ गुप्ता, महादेव शेठ कोळेकर, दत्ता शेठ कोळेकर,यांसह इतर दिग्गज मान्यवरांनी या दहीहंडी उत्सव सोहळ्यास उपस्थिती लावली होती.
मराठा प्रतिष्ठान सामाजिक संस्था, श्री पप्पू शेठ युवा मंच सदर कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी मराठा प्रतिष्ठान सामाजिक संस्था,व श्री पप्पू शेठ युवा मंच या सर्व सहकारी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली होती. सर्वांचे मनापासून आभार
Post a Comment
0 Comments