Type Here to Get Search Results !

शून्यातून विश्व निर्माण करणारी माझी प्रिय मैत्रिणीस अभिष्टचिंतनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!!



माझ्या बालपणापासून तर कॉलेजवयीन जीवनापर्यंत माझ्यासोबत असलेली माझी प्रिय मैत्रीण छाया," खरंच काही माणसं अफलातून असतात ,कसलाही आधार नसताना शून्यातून विश्व निर्माण करतात"

 आजचा खास दिवस तो म्हणजे माझी प्रिय मैत्रीण छाया आज हिचा वाढदिवस माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.," मैत्रीचं नातं आपलं कधीच तुटणार नाही, प्रेम भाव मनातील माझ्या तुझ्याविषयीचा कधीच संपणार नाही"

         झाडीपट्टी परिसरातील अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया येथील माझी मैत्रीण छाया हिचा 15 सप्टेंबरला जन्म झाला घरची परिस्थिती तशी हलाखीचीच होती घरामध्ये आई-बाबा तीन बहिणी आणि एक भाऊ एकूण सहा सदस्य होते बाबा शासकीय वस्तीगृहाचे वार्डन होते .ते किरायानेच राहायचे. माझी मैत्रीण छाया अभ्यासात अतिशय हुशार होती. सुरुवातीपासूनच तिचा प्रत्येक वर्गामध्ये नंबर यायचा. दहावीनंतर आम्ही दोघे वेगवेगळ्या झालो. तिने कला शाखेत प्रवेश घेतला आणि मी सायन्स मध्ये पुन्हा दोन वर्षानंतर आम्ही परत दोघींनी एकाच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला . शिवप्रसाद सदानंद जयस्वाल कॉलेज अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया ह्या कॉलेजमध्ये आम्ही प्रवेश घेतला. आम्ही दोघी कॉलेजला सोबत जायचं पुन्हा आमचा आनंद द्विगुणीत झाला तिने बीए ला इतिहास विषय घेतला तिचा इतिहास अगदी मुखपाठ होतं तिला इतिहास विषय फारच आवडायचा तिने नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन इतिहासामध्येच केलं आणि प्राविण्य प्राप्त केल. तिला समोर बी.एड. करून जॉब करायचं होतं नंतर हिच्यावर आई-बाबांची जबाबदारी आली आणि 

         मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच अशी मुलगी बघितली जिने स्वतःच्या इच्छा, आकांक्षा त्यागून आई-वडिलांसोबत राहून आई-वडिलांची सेवा केली आणि बहिणींचे भविष्य उज्वल केलं. प्रत्येक पावलोपावली तिला तिच्या आई-वडिलांनी साथ दिली. जेव्हा ती मनाने खचून जायची तेव्हा तिच्या बाबांनी तिला धीर दिला रात्र,- रात्र जागून जेव्हा ती पुस्तके लिहायची तेव्हा तिची झोपच हरवून जायची. तेव्हा तिला तिची आई हाक मारायची छाया, आता तुझं लिहिणं बंद कर. तुझी तब्येत बिघडेल झोप आता तू .साहित्यिक क्षेत्रांमध्ये गेलेल्या व्यक्तीला झोप येते तरी कुठे ह्या अशा साहित्यिकांमुळेच आज आपल्याला एवढ्या चांगल्या प्रकारचे साहित्य आपल्या पर्यंत पोहोचत आणि आपल्याला वाचायला मिळतं.   

          " स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी" आईची बरोबरी कुणीच नाही करू शकत. तरी सुद्धा सगळ्यात जास्त ओढ ही बाप- लेकीच्या नात्यात असते .बापाचं काळीज म्हणजे लेक असते. आई-वडिलांच्या प्रेमाची तुलना नाहीच होऊ शकत तरी बापाचं लेकीवरच आणि लेकीच बापावरचं प्रेम चिमूटभर तरी जास्तच असतं. बाप हा कधीच लेकीच्या डोळ्यात अश्रु आणित नाही तो एकमेव बापच असतो .संपूर्ण जगजरी विरोधात गेलं तरी बाप लेकी सोबत खंबीर उभा असतो. बाप म्हणजे विशाल आभाळ असतो .उंच भरारी घेण्यासाठी साद घालत असतो .बाप म्हणजे वादळातलं घर असतं. सुखरूप निवाऱ्याच जणु एक स्थान असतं .बाप हा स्वतःच्या कष्टाची शिदोरी तो हसत हसत आपल्या लेकीवर कुरबान करतो. न बोलता प्रेम करतो, आधार देतो ,न थकता कष्ट करतो आणि पावलोपावली आपल्या लेकीच्या सोबत असतो तो बापच असतो. खिसा रिकामा असला तरी नाही कधी म्हणाला नाही. त्याच्यापेक्षा श्रीमंत असा जगी कुणी नाही तो बापाच असतो जो आपल्या लेकीसाठी दुःखातही हसत असतो. लेक मनाने खचली तरी धीर देणारा बापच असतो. बालपणात बाप हा लेकीची सावली होतो पण नंतर मात्र लेक ही बापाची सावली होते .तीच सावली, तीच लेक, तीच मैत्रीण ,तीच छाया ,झाली ती आपल्या आई-बाबांची छाया,अशी माझी मैत्रीण छाया. ह्या नावाचे तीन पूर्णरित्या सार्थक केलं आहे. म्हणून माझ्या मैत्रिणीसाठी काही वास्तविकता मांडणाऱ्या ओळी.

       " कधी ना तू प्रीतीसाठी कधी ना तू पतीसाठी 

कधी ना तू लेकरांसाठी झिजली तू फक्त मायबापांच्या सेवेसाठी"

 "आन -भान न हरपता

ना जगली तू अशी- तशी जगली तू फक्त समाजाच्या रीतीसाठी "

जि.परिषद जुनियर कॉलेज अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया येथे कंत्राटी म्हणून कला शाखेला वर्ग 11 आणि बारावीला इतिहास विषय शिकवायला जायची त्यानंतर काही वर्षांनी त्याच ठिकाणी प्राध्यापिका म्हणून रुजू झाली आणि आपली छाया तानबाजी बोरकर म्हणून आपली ओळख निर्माण केली पण ह्यासाठी तीला बराच संघर्ष करावा लागला.

            आपल्या आईच्या नावाचं मातोश्री जिजाऊ बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची स्थापना 2018 मध्ये केली आणि ह्या संस्थेअंतर्गत व्यवसाय प्रशिक्षण राबवून गाव पातळीवर" गाव तिथे शाळा "चालवून गोरगरीब मुला-मुलींना शिक्षण देऊन स्वावलंबी केलं तसेच ह्या संस्थेअंतर्गत" बेटी बचाव बेटी पढाव" कार्यक्रमाची नियोजन केलं. कोरोना काळात लसीकरण विषयी जनजागृती केली आणि मास्क वाटप केले .2023 मध्ये गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी या दोन तालुक्यात प्रत्येक खेडोपाडी लहान मोठ्या शाळेत जाऊन चित्रपटाच्या माध्यमातून एड्स जनजागृती मोहीम राबविली. 

    " छाया ,तू गं तुझ्या जीवनात असे काही केलं. हजारो विद्यार्थ्यांचे सोने तु गं केलं. स्वप्न होते मानवतेचे, स्वप्न होते शिक्षणाचे, मेहनतीने तू गं सामान्या पर्यंत पोहोचवलं .अपार कष्ट करूनी ज्ञानमंदिर फुलवलं. आर्थिक पाठबळ नसतांना सुद्धा धाडस तु गं केलं. अथक प्रयत्न आणि अफाट मेहनतीने सामान्यांचे स्वप्न तू गं साकार केलं. "

     तुझा हा ज्ञानाचा वारसा असाच पुढे पुढे नेत रहा. कवयित्री ,लेखिका, साहित्यिक अशा विविध क्षेत्रात कार्य करून साहित्य उपक्रम राबविले व साहित्य क्षेत्रात साहित्याची सेवा केली साहित्य क्षेत्रामध्ये तिने अनेक पद भूषविले त्यातील... 

१)अखिल भारतीय मातोश्री जिजाऊ परिवर्तन मराठी साहित्य परिषद समूहाचे संस्थापक

२) अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष 

३)विचार मंथन जागतिक सांस्कृतिक कला मंचच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष

४) आपले मानवाधिकार यांचे तालुकाध्यक्ष

५ )डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य समूहाचे गोंदिया जिल्हा संघटक प्रमुख

६) गिरजा प्रतिष्ठान समूहाचे साहित्य गोंदिया जिल्ह्याचे अध्यक्ष. अशी अनेक पदे भूषविले. म्हणून म्हणावसं वाटतं ....

         "हे सखी तू लेखनीस लेकरू मानून ,दिले अनेक लेखणींना जन्म तू 

आणि गाजलीस साहित्यिक क्षेत्रात तू अनेक पुरस्काराने प्रतिभावंत होऊनी तु" 

       यातीलच काही पुरस्कार प्रदान करण्यात आले ते पुढील प्रमाणे ....

१)राष्ट्रीय स्तरावर इंडियन आयडल स्टार अवॉर्ड 2022 मुंबई

२) ग्लोबल गोल्ड ऑफ रेकॉर्ड मुंबई 2023 

३)नारी रत्न पुरस्कार 2023

४) नारीशक्ती पुरस्कार 2023 

५)समाजभूषण पुरस्कार 2023 पुणे 

६)काव्यरत्न पुरस्काराने सन्मानित

७) चैतन्य प्रभा पुरस्कार

८) भारत गौरव पुरस्कार नागपूर 

९) काव्य लेखन पुरस्कार नाशिक

          हिने शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक क्षेत्रामध्ये जिद्द ,चिकाटी आणि प्रामाणिकपणे कार्य केलेले आहे म्हणून मला असं म्हणावसं वाटतं 

     "वंदन तुझ्या साहसाला वंदन तुझ्या कर्तुत्वाला

 वंदन तुझ्या सहनशीलतेला वंदन तुझ्या विरतेला," माझ्या प्रिय मैत्रिणीने साहित्य क्षेत्रात अफाट अशी कामगिरी केली आहे. विदर्भातील मातीने समाज सुधारकांचा एक मोठा वारसा जसा जपलेला आहे. याशिवाय साहित्य लेखनाची एक मोठी परंपराही विदर्भाला लाभलेली आहे. त्यातीलच झाडीपट्टी परिसराने 100 सव्वाशे वर्षाची परंपरा जोपासित नाट्यकलेला जिवंत ठेवण्याचे महत्त्वाचे कार्यही केले आहे तसेच याच परिसरामधून माझी प्रिय मैत्रीण कवियित्री ,लेखिका, साहित्यीक छाया बोरकर हिच्या सक्षम अशा कविता आज आकाराला येत आहेत. 

       "आकाशी भरारी घेऊन सुद्धा 

स्त्रीत्वाचे कर्म पुरवून सुद्धा पवित्र्याच्या नावाखाली तुडविले तुजला 

तरी देखील तू हार न मानशी मनाशी"

 प्रिय छाया तुझ्या लेखनाची शैली खरंच अप्रतिम आहे. तुझे साहित्यिक क्षेत्र सूर्याच्या प्रखर तेजा प्रमाणे सतत प्रकाशित राहू दे. या प्रकाशाच्या सुगंध तुझ्या साहित्यातून सतत सर्वत्र दरवळत राहू दे .तुझ्या लेखणीतून सर्वांना सतत प्रेरणा मिळावी .तुझे यश नक्कीच आकाशाला गवसणी घालणारे असणार आहे‌ तुझ्यातील संयम, विश्वास, सातत्य, आपल्या कामाबद्दल एकाग्रता, आपल्या कार्यातील प्रेम, जिद्द, समजूतदारपणा, शांतपणा ह्या सर्व गोष्टी तुला तुझ्या यशाकडे नक्कीच घेऊन जातील .तुझा प्रकाशित झालेला 2001 सालचा "पळसफुले " काव्यसंग्रह .दुसरा" शापित श्रृंखला "काव्यसंग्रह असून त्यातील कविता एकाच वेळी नानाविध विषयांना उत्कट पणे प्रगल्भरीत्या स्पर्श करतात. त्यामुळे ह्या कवितांचे सामर्थ्य हे सामाजिक दृष्ट्या अतिशय मोलाचे ठरते. एक स्त्री म्हणून समाजाकडे आणि जीवनातील अनुभवांकडे डोळसपणे पाहतांना जे अनुभव वाटायला येतात त्या समग्र अनुभवांचा लेखा-जोखा ह्या काव्यसंग्रहात आढळून येतो." रणरागिनी" कादंबरी, शेर शिजला इस्तो ईजला", "माणसाने खाल्ल्या मिठाला जागावं" ,"अडला हरी गाढवाचे पाय धरी"( विचार मंथन)" हृदयात हिरवाई जपतांना "(चारोळी संग्रह) यांना आतापर्यंत भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.यानंतरही प्रकाशनाच्या वाटेवर असलेली पुस्तके "जगाला पुन्हा बुद्ध पाहिजे", "शिक्षण गेले चुलित ","हॅलो सावित्री ","वेड्या बहिणीची वेडी माया "(कथासंग्रह) ह्या संग्रहांना सुद्धा चांगलाच प्रतिसाद मिळेल त्याबद्दल माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा .

    येणारा प्रत्येक दिवस तुला यश, ज्ञान देवो आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो. पुनश्च एकदा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा .. 

              तुझीच प्रिय मैत्रीण

              वैशाली रामटेके

       ता. ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर

Post a Comment

0 Comments