घोडेगाव-श्री हरिश्चंद्र महादेव संस्थानच्या ग्रामदेवी स्वयंभू श्री कमलजा भवानी मंदिरामध्ये शारदीय नवरात्रीला उत्साहात सुरुवात झाली. संस्थांनचे अध्यक्ष प्रशांत काळे पाटील यांच्या हस्ते व मंदिरातील पुजारी मयूर घोलप यांच्या उपस्थित सकाळी देवी मंदिरात श्री सूक्त अभिषेक करून घटस्थापना करण्यात आली.मंदिरातील घटस्थापने नंतर प्रथे परंपरे नुसार ग्रामस्थांनी कुलधर्म कुलचारा प्रमाणे आप आपल्या देवघरात घटस्थापना केल्या.त्यानंतर वेद पंडित रुपकिशोर चंदपुरिया यांनी दुर्गा सप्तशती पाठस सुरुवात केली. त्याची सांगता 30 सप्टेंबर रोजी अष्टमीचे दिवशी नवचंडी महायज्ञाने पंडित राकेश नरखेडकर यांचे पोराहित्याने होणार आहे. अशी माहिती कोषाध्यक्ष राजेश काळे व सचिव नितीन काळे यांनी दिली. मंदिरात रोज सकाळी स्वानंद काळोखे आणि पार्टी यांचे वतीने सनई चोघडा वादन तर संध्याकाळी अकले परिवाराच्या वतीने संबळ वादनाचा कार्यक्रम परंपरेने होतो.
रविवार दिनांक २८/९/२०२५ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता कन्या पूजनाचा कार्यक्रम ,तसेच सात वाजता महिलांची सामुहिक आरती व आरतीनंतर सरस्वती बचत गटाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्त सौ.क्रांतीताई गाढवे यांनी दिली.

Post a Comment
0 Comments