Type Here to Get Search Results !

कोलदरा गोणवडी येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 'स्वस्थ नारी सशक्त परिवार' कार्यक्रम संपन्न.



प्रतिनिधी : सुरंजन काळे

घोडेगाव : कोलदरा गोणवडी येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 'स्वस्थ नारी सशक्त परिवार' या उपक्रमाला उत्साहात सुरुवात झाली. महिला व बालकांचे आरोग्यही सक्षम कुटुंब आणि समाजाची मूलभूत गरज आहे, या उद्दिष्टाने हा विशेष उपक्रम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबवला जाणार आहे.



कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सरस्वती प्रतिमेचे पूजन सरपंच तेजस काळे, उपसरपंच सागर केवाळे , डॉ.मनीषा पंडित, आरोग्य सेवक गणेश मारेकर, रणवीर गहिरवार ,टेक्निशियन अपर्णा बनकर , पोलीस पाटील अमित केवाळे,अशा सेविका अशा काळे ,सविता राजगुरू, सुरेखा गभाले, सुरेखा दळे, अंगणवाडी सेविका पुनम काळे, पूनम मंडलिक, राधा काळे, तेजल गुळवे, कविता जाधव, मार्तंड काळे, अनिल दरेकर, रमेश काळे,एकनाथ बोराडे, अमित काळे, संदेश काळे, उमाजी दरेकर, भरत काळे, यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ.मनीषा पंडित, आरोग्य सेवक गणेश मारेकर, रणवीर गहिरवार, टेक्निशियन अपर्णा बनकर, अशा सेविका अशा काळे, सविता राजगुरू, सुरेखा गभाले, सुरेखा दळे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या अभियानांतर्गत महिला व बालकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी, पोषण, लसीकरण, क्षयरोग तपासणी, रक्तदान शिबिरे आदी विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवले जाणार आहेत. यासोबत "महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृतीसाठी हे अभियान अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायत कोलदर/गोणवडी आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गिरवली केंद्रामार्फत अभियान कालावधीत महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आज दिनांक २०/०९/२०२५ रोजी कोलदरे गोणवडी येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानंतर्गत महीला व बालकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी, पोषण लसीकरण क्षयरोग तपासणी उच्च रक्तदाब मधुमेह कर्करोग नेत्र तपासणी व किरकोळ आजारावर औषधी उपचार करण्यात आल्या तसेच आरोग्यविषयक समुपदेशन करण्यात आले.



Post a Comment

0 Comments