*उंबरठा*
उंबरठा तसा फार काही उंच नसतो...
सहज ओलांडता येतो!
ओलांडता येत नाहीत त्याने लादलेल्या अनाठायी मर्यादा...
ज्या अब्रू, कर्तव्य, जबाबदारी आणि परंपरेच्या नावाखाली आजही अडसर ठरत आहेत स्वातंत्र्य मागणाऱ्या पायांना...
म्हणून हातांनाच आता बंड करावा लागेल...
पडद्यामागे झाकलेल्या चेहऱ्यावरील वेदना दाखवायला तो पडदाचं बाजूला सारावा लागेल...
तेव्हा कुठे दिसतील तिच्या डोळ्यांमधील गोठलेली असंख्य स्वप्नं...
या मोतीबिंदू झालेल्या धर्मांध डोळ्यांना...
या मोतीबिंदू झालेल्या धर्मांध डोळ्यांना...
सुमेध वंदना मधुकर सोनावणे
9967162063

Post a Comment
0 Comments