Type Here to Get Search Results !

कुमशेत शाळेत अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात साजरा.

 


जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुमशेत येथे अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. आशितोष दिलीप डोके, शा. व्य.सदस्य श्री. संदीप डोके, शा. व्य स .सौ. हिना इनामदार, श्री. महेंद्र वाणी, श्री. देविदास वाणी, श्री. मयूर भगत, श्री. दत्तात्रय डोके तसेच अंगणवाडी सेविका सौ. प्रियंका डोके, हर्षदा डोके .प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


उपस्थितीत .सर्व विद्यार्थ्यांनी पालखी दिंडी काढून काव्यसंग्रह,ग्रंथ,पुस्तके हातात घेत मराठी भाषेचा जागर घोष दिला. मराठी माझी मायबोली, बोलू मराठी,वाचू मराठी,लिहू मराठी,“भाषा जपली की संस्कृती आपली” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.



सप्ताहात विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता, नाटिका, निबंध, पत्रलेखन, संवादलेखन, हस्ताक्षर स्पर्धा अशा विविध उपक्रमांतून आपली कला सादर केली. कवितांमध्ये नयन डोके, शिवांश डोके, अनन्या डोके, स्वरा डोके, ओवी डोके, विराज वाणी, रुद्र डोके, श्रुती डोके, रिया दुधाळ, तनुज डोके यांनी स्वरचित कवितां मधून मराठी कवितेची गोडी खुलवली. तर विराज डोके, आरव दुधाळ, आली म इनामदार .माहिरा इनामदार, समर्थ वाणी, अथर्व डोके, दिव्या डोके, देवांश डोके, मानसी वाणी आदींनी गप्पा–गोष्टी व अनुभव मांडले. लेखनात सहभाग घेतला .इ उरी व ४थी च्या विदयार्थांनी ग्रंथालयातील . पहिली ते पाचवी स्तरातील अवांतर पुस्तकांचे परिक्षण केले .

या कार्यक्रमात कविवर्य यशवंत घोडे सरांनी मराठी भाषेच्या ११०० वर्षांच्या वैभवशाली परंपरेवर प्रकाश टाकत स्वरचित कविता सादर केली. तसेच श्याम लोलापोड सरांनी संतसाहित्य, लिपी आणि संस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच ग्रंथवाचनाचे महत्त्व अधोरेखित करून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.

ग्रामस्थ, पालकांनी .शाळेतील उपक्रमांचे भरभरून कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमात भाषेची नाळ, संस्कृतीची ओळख आणि साहित्याची गोडी अनुभवता आली. अभिजात मराठी भाषा सप्ताहामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला, सृजनशीलता फुलली, कल्पनाशक्ती जागृत झाली आणि संस्कृती मूल्यांची जोपासना घडली.

Post a Comment

0 Comments