Type Here to Get Search Results !

जागतिक टपाल दिनानिमित्त जुन्नर टपाल कार्यालयात कर्मचाऱ्यांचा सन्मान.



जुन्नर (९ ऑक्टोबर २०२५) – जागतिक टपाल दिनानिमित्त जुन्नर टपाल कार्यालयात एक आगळीवेगळी काव्यात्मक सन्मानपर परंपरा पार पडली.

“नक्षत्रांचे देणे काव्य मंच” व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद (जुन्नर तालुका शाखा) तर्फे कवी श्री. यशवंत घोडे यांनी टपाल विभागातील कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान केला.


या प्रसंगी कवी यशवंत घोडे यांनी आपल्या कवितेतून टपाल सेवेचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी नमूद केले की 

पोस्ट ही केवळ पत्रांची वाहक नसून आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कठीण प्रसंगातही पत्रे, पार्सल व मनीऑर्डर घरोघरी पोहोचवणारे कर्मचारी सायकलवरून खेड्यापाड्यांत प्रवास करतात. लोकांच्या आनंद, दुःख, आशा-अपेक्षा पोहोचवण्याचे कार्य हे कर्मचारी करतात. त्यामुळे त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून सन्मान करणे ही काळाची खरी गरज आहे.

या कार्यक्रमात पोस्टातील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. 

सौ .पूजा गायकवाड .मॅडम (सब पोस्ट मास्टर), सौ.कांचन तिखे, दीपक साळवे, आकाश श्रीवास्तव, किरण सोनवणे, अनिरुद्ध मटकर, हरिभाऊ साबळे, संजय चौधरी, वैभव सोमवंशी, नवनाथ पानसरे, रोहिदास पारधी आणि बापूसाहेब भगत यांचा गुलाबपुष्प व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

या वेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी टपाल सेवेला भारतातील सर्वात विश्वासार्ह सेवा.असे संबोधले आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी टपाल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी कवी यशवंत घोडे .सर व नक्षत्रांचे देणे काव्य मंच, पुणे शाखा” यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Post a Comment

0 Comments