मंचर
संपूर्ण पुणे जिल्ह्यात आपले व्यवसाय ,शिक्षणक्षेत्रातील पदव्या, मातोश्री शालीनीबाई नारायणशेठ निघोट व स्मार्ट इंडीया इंग्लीश मिडीयम स्कूलचे संस्थापक व हजारो शिक्षकांना बी. एड.,एम.एड. लाख हजारो शिक्षकांना घडविण्यात सिंहाचा वाटा असलेले मंचर निघोटवाडीचे प्राचार्य डॉ अनिल नारायण निघोट, निघोटवाडी मंचर यांना शिक्षणक्षेत्रातील सर्वोच्च पदवी डॉ.गीता शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बी एड विद्यार्थी शिक्षकांची भावनिक बुद्धिमत्ता व त्यावर सहकार्यात्मक अध्ययनाधिष्ठीत कार्यक्रमाच्या परिणामकारकतेचा अभ्यास या संशोधनास पीएचडी पदवी जाहीर झाली असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
प्राचार्य डॉ अनिल निघोट शिक्षक प्रशिक्षण क्षेत्रात सतरा वर्षांपासून अध्यापन करत असुन अनेक शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य त्यांचे विद्यार्थी असुन आपापल्या संस्थेत ऊत्तम काम करत आहेत, अनिल निघोट अनेक नोंदणीकृत संस्था़चे संस्थापक अध्यक्ष असुन आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे पुणे जिल्हाप्रमुख या पदावर काम करत असुन भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी तालुकाप्रमुख म्हणून विद्यार्थ्यांना न्याय देत उत्कृष्ट संघटक,सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
प्राचार्य डॉ अनिल निघोट यांनी शैक्षणिक क्षेत्रात अनेक विषयांवर संशोधन केले असून अनेक संशोधन पेपर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाले असुन समाजकार्य, इतिहास, मराठी,हिंदी, पत्रकारीता, व्यवस्थापन अशा अनेक विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केलेली असुन, बाल समुपदेशक म्हणून काम करत आहेत,तीन विषयात सेट,टिईटी,टेट पात्र असुन मानसशास्त्र हा त्यांचा आवडीचा विषय आहे. सर्वोच्च पदवी प्राप्त केली असली तरीही आयुष्यभर शिक्षण घेत रहाणार व नवनवीन कौशल्ये आत्मसात करणारे शिक्षक घडवणार, विद्यार्थ्यांना प्रेरणा देत रहाणार,व ग्रामीण भागात पैसे कमवण्यायाऐवजी विद्यार्थ्यांना कमीत कमी फि मध्ये सर्वांगीण विकासावर भर देणार असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment
0 Comments