Type Here to Get Search Results !

राळेगण येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न.



राळेगण ता. जुन्नर, पुणे गावात विजयादशमी (दसरा )मुहूर्तावर सुरु झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची गुरुवार दि. 9/10/2025 रोजी हभप आदिनाथ महाराज जुन्नरकर (खडकी पिपंळगाव )यांचे काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. ह्या नामयज्ञासाठी परिसरातील अनेक गावातील भाविक भक्तांनी हजेरी लावली.

कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करण्यात आले होते व सायं. 7 ते 9 कीर्तनसेवा नंतर भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.  



रात्री जागर,पहाटे काकडा,सकाळी प्रवचन, सायं.नेमाचे भजन व हरिपाठ अशी विविध सांप्रदयाची मूल्य जपण्यात आली होती.

दर्जेदार कीर्तनसेवा व अन्नदात्याचे अन्नदान प्रमुख आकर्षण होते. तसेच वै. हभप बबन मारुती गायकवाड यांचे स्मरणार्थ श्री. हनुमान बबन गायकवाड यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे लकी ड्रॉ द्वारे रोज महिला व पुरुष वर्गात प्रत्येकी एक चिठ्ठी काढून कीर्तन संपले नंतर वाटप केले.

पांडुरंगाच्या चरणी भक्तीभाव अर्पण करण्याचा विशेष भार अन्नदात्यांनी घेतला.



पहिला दिवस- चंद्रकांत द्वारकानाथ उंडे.

दुसरा दिवस - अंकुश निवृत्ती उंडे

तिसरा दिवस - रंगनाथ श्रीराम जाधव

चौथा दिवस - दिनकर पाटीलबुवा उंडे

पाचवा दिवस - मच्छिंद्र तुकाराम गायकवाड

सहावा दिवस - मारुती पांडुरंग उंडे व बाळासाहेब पांडुरंग उंडे

सातवा दिवस - आनंद जयराम उंडे, दत्ता शांताराम उंडे व संतोष नामदेव उंडे.



वरीलप्रमाणे अन्नदात्यांनी सात दिवस पांडुरंगाचरणी अन्नदानाचा संकल्प सोडला.

राळेगण ग्रामस्थ, मुंबईकर पुणेकर मंडळी सर्वांनी वर्गणीस्वरूप ह्या नामयज्ञास मोठा हातभार लावला.

तसेच अखंड हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत परमभक्त हनुमान व श्री विठ्ठल रखुमाई मंदिर जीर्णोद्धाराचा संकल्प करून भूमिपूजन सोहळा पार पाडला.

राजू शिवाजी उंडे, पंढरीनाथ शिंदे, अजय सोनवणे, राजूभाऊ उंडे, वैभव गायकवाड, अशोक उंडे, नामदेव उंडे, चित्रसेन शिंदे, भास्कर उंडे, बाजीराव उंडे, किसन उंडे, गौतम उंडे, बाळू गायकवाड, लहू जाधव, अंकुश जाधव, अंकुश गायकवाड, आनंद उंडे, लक्ष्मण उंडे,अर्जुन उंडे, रंगनाथ जाधव,मयूर उंडे, संजय उंडे, अंकुश उंडे,रखमा विष्णु शिंदे व हनुमान प्रासदिक भजन मंडळ राळेगण या सर्वांनी आठ दिवस मोलाचे सहकार्य केले.

श्री संतोष विठ्ठल उंडे व चंद्रकांत तानाजी सोनवणे यांनी आठ दिवस चोपदार म्हणून काम पहिले. तसेच लहान गटात कु,वेदांत गायकवाड, मनोज भालेराव, आर्यन कोंदे, वेदांत सोनवणे व कुमारी शिवानी उंडे

श्री.चंद्रकांत द्वारकानाथ उंडे, व रविंद्र सदाशिव सोनवणे यांनी आठ दिवस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाळले.व राजूपाटील उंडे यांनी नियोजनकडे विशेष लक्ष दिले.

Post a Comment

0 Comments