Type Here to Get Search Results !

ऑनलाइन कामे बंद करा शिक्षक समिती जिल्हा सविचार सभेत एकमताने ठराव मंजूर



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर

रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीची सहविचार सभा किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर या ठिकाणी विविध विषयावर विचार मंथन करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.यावेळी अध्यक्ष स्थानावरून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्ष समितीचे कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर बोलत होते.होळकर सरांनी सांगितले की सध्या शिक्षक ऑनलाईन कामाने बेजार झालेला आहे. ऑनलाइन कामामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणे मुश्किल झाले आहे.अनेक प्रकारचे जिल्हा परिषदेचे राज्य शासनाचे ॲप सततच्या ऑनलाईन कामाचा भडी मारा सतत येणाऱ्या लिंक यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या दुराव निर्माण झाला आहे. शिक्षक तासंतास ऑनलाइन काम करण्यात व्यस्त असल्याने गुणवत्तेवर त्याचा परिणाम होत आहे.या सर्वांना विरोध करण्यासाठी राज्य शाखेच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक समितीने भविष्यात मोठा लढा उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुनील वाघ व सरचिटणीस संदीप आप्पा जगताप यांनी दिली. पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या या सभेमध्ये खालील ठराव मंजूर करण्यात आले.



* *टीईटी परीक्षेला सर्वांनी विरोध करायचा कोणी टीईटीचे फॉर्म भरायचे नाही* 

* *ऑनलाइन कामे कमी झाली नाहीत तर त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.*

* *15 मार्च 2024 शासनादेश रद्द झाला पाहिजे त्यासाठी जनजागृती करणे*

* राज्य सरकार TET विरुद्ध पुनर याचिका दाखल करणार आहे.त्याचप्रमाणे शिक्षक समिती च्या कामाचा लेखाजोखा या मीटिंगमध्ये घेण्यात आला. तसेच जुन्नर आंबेगाव तालुक्यात एकस्तर वेतनसरणी, वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी ऑनलाईन बदल्या सातवा टप्पा कार्यमुक्ती यासंदर्भात सविस्तर विचारमंत या सभेत करण्यात आले जुन्नर व आंबेगाव तालुक्यात पेसा भागात काम करणाऱ्या 41 शिक्षण सेवकांचा तसेच केंद्रप्रमुख मुख्याध्यापक पदोन्नती झालेल्या शिक्षकांचा सन्मान आजच्या या पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे सहविचार सभेत करण्यात आला. या कार्यक्रमाची प्रस्ताविक बाळासाहेब लंगी सर यांनी केले.या सभेचे उत्कृष्ट नियोजन पुणे जिल्हा शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष आणि पतसंस्थेचे संचालक बाळासाहेब लांघी, अध्यक्ष राजेश दुर्गुडे कार्याध्यक्ष विठ्ठल जोशी नामदेव मुंढे,विलासराव कुदळ, सरचिटणीस राजेंद्र गारे बाळासाहेब गोडे, कैलास मुठे,महिला अध्यक्ष स्वाती भोर गौरी लांघी यांनी केले होते या मीटिंगसाठी सर्व तालुक्याचे तालुकाध्यक्ष,सरचिटणीस जिल्हा पतसंस्थेचे संचालक उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल जोशी यांनी केले व आभार अध्यक्ष राजेश दुर्गुडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments