Type Here to Get Search Results !

कवी सुमेध सोनवणे लिखित काव्य रचना "येवला ते दीक्षाभूमी"



हर्ष दाटला साऱ्या अवनी

आनंदाची घटना जीवनी


मार्ग दाविला बुद्धां चरणी

धर्मांतराची घोषणा करुनी


जन्माने जो धर्म मिळाला

प्रगती आमची गेली तळाला


माणसाला माणूस नाही कळाला

विटाळ बोलून दूर पळाला


नव्हता हक्क आणि अधिकार

जाती पातीचा खुला बाजार


जगणे केले होते बेजार

अस्पृश्यतेचा हाहाकार


भीमाने आमचे दुःख जाणले

आम्हालाही माणसात आणले


तथागतांचे तत्व मानले

दीक्षा घेण्याचे मनी ठाणले


नागपूर ठरले दीक्षाभूमी

उत्साहाला नव्हती कमी


प्रसंगी अशा मंगल कामी

लहान थोर आले मुक्कामी


असा माझा भीम गुणी

आजन्म आम्ही त्याचे ऋणी


बौद्ध धम्म दिला जनी

अशोक विजयादशमी दिनी


सुमेध वंदना मधुकर सोनावणे

9967162063


धम्मचक्र प्रवर्तन दिन तथा अशोक विजयादशमीच्या मंगलमय सदिच्छा!

🙏🙏🙏🌷🌷🌷

Post a Comment

0 Comments