प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित,समर्थ गुरुकुल बेल्हे या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये नुकताच शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त गुरुकुल मधील महिलांनी भोंडल्याचा कार्यक्रम साजरा केला अशी माहिती प्राचार्य सतीश कु-हे यांनी दिली.
भारतीय संस्कृतीतील स्त्री शक्ती व सामूहिकतेचे प्रतीक असलेल्या या उपक्रमात विद्यार्थिनींनी पारंपारिक पोशाख परिधान करून देवीच्या ओव्या सादर केल्या.भोंडल्याच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी एकोपा सामाजिक बांधिलकी व सांस्कृतिक वारशाचे महत्व अधोरेखित केले,या कार्यक्रमातून जुन्या परंपरेची ओळखतर झालीच शिवाय विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास व सांस्कृतिक जाणही वृद्धिंगत झाली.
माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके यांनी विद्यार्थिनींच्या उत्साही सहभागाचे कौतुक करताना,भोंडला हा खेळ नसून संस्कृती व सामूहिकतेचे दर्शन घडवणारी परंपरा आहे असे प्रतिपादन केले.आश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला भोंडल्याच्या कार्यक्रमाची सुरुवात होते.भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात प्रचलित असलेल्या स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे.नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी खेळला जातो.गुरुकुलच्या शिक्षकांनी देखील भोंडल्याची पारंपारिक गाणी म्हणत विद्यार्थ्यांबरोबर भोंडल्याचा आनंद लुटला.ठेका,ताल,लयबद्ध अशा आनंदी उत्साहाच्या वातावरणात भोंडल्याचा खेळ चांगलाच रंगात आला होता.
कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा संचालक एच पी नरसुडे व पर्यवेक्षक सखाराम मातेले यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागामार्फत शितल पाडेकर,स्नेहल ढोले,दिपाली नवले,योजना औटी,अक्षता गुंजाळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या नियोजन केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,सारिका ताई शेळके,जुनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर,मीराताई शेळके संगीताताई शेळके गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.शितल पाडेकर यांनी केले तर दिपाली नवले यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment
0 Comments