प्रतिनिधी घोडेगाव | सुरंजन काळे
आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, घोडेगाव येथे आजी आजोबा दिन म्हणजेच GRAND PARENTS DAY उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री तुकाराम काळे , उपाध्यक्ष एडवोकेट श्री संजय आर्वीकर , कार्याध्यक्ष श्री सुरेश काळे , संस्थेचे सचिव श्री विश्वासराव काळे जॉईंट सेक्रेटरी श्री प्रशांत काळे, समन्वय समिती चेअरमन श्री राजेश शेठ काळे,खजिनदार श्री सोमनाथ काळे , संचालक श्री अजित काळे सर, श्री अक्षय काळे व श्री वैभव शेठ काळे, विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती मेरिफ्लोरा डिसूझा , उपप्राचार्या रेखा आवारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात सौ जागृती महाजन यांचे *आनंदी आयुष्य कसे जगावे?* या विषयावर व्याख्यान झाले.
श्री सुरेश डोंगरे यांचा वऱ्हाड निघाले लंडनला हा एकपात्री हास्य विनोदी कार्यक्रम झाला. तसेच शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांनी आजी-आजोबां साठी सुंदर अशा नाटकाचे सादरीकरण केले. त्याचबरोबर इ. सहावी सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी अप्रतिम असे नृत्याविष्कार सादर केले.
कार्यक्रमामध्ये आजी आणि आजोबांचा रॅम्प वॉक ही घेण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती अक्षया भेेके मॅडम, सौ स्मिता पवळे, श्री सागर लोखंडे सर, सौ वर्षा पवार, सौ अमिता चासकर, श्री तनपुरे सर व श्री उदय बेंढारी सर यांनी केले. आजच्या काळात आजी आजोबा म्हणजे घरातील अडचण किंवा बिन कामाची व्यक्ती असे न समजता त्यांनाही मानसिक आणि भावनिक आधार देणे गरजेचे आहे. विद्यालयाने विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांसाठी अशा पद्धतीचा कार्यक्रम ठेवल्याबद्दल खरोखरच संस्थेचे व विद्यालयाचे आम्ही ऋणी आहोत असे उद्गार पत्रकार श्री विकास गाडे यांनी काढले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सागर लोखंडे व कु. तनया बोऱ्हाडे हिने केले. आभार प्रदर्शन श्रीमती अक्षया भेके यांनी केले.
👌👌👌🙏
ReplyDelete